हिमरू
औरंगाबाद शहराचे ऐतिहासिक महत्व वादातीत आहे. इतिहासातील अनेक घटना, व्यक्तींचा संदर्भ औरंगाबादशीअसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. या शहरावर अनेक राजे, महाराजांनी राज्य केले. त्यांच्या कार्यकाळातीलअनेक साधक-बाधक बाबींचे पुरावे इतिहासात सापडतात. जगप्रसिद्ध अजिंठा व वेरूळच्या लेण्या, बिबी कामकबरा, पाणचक्की हे सगळं बघितल्यावर आपल्याला खरेदीसाठी खुणावते ती इथली पैठणी साडी आणि हिमरूशाल. औरंगाबादच्या अत्यंत जुन्या आणि मध्यवर्ती भागात अगदी अरूंद गल्लीत या ‘हिमरू‘ हातमागाचाकिणकिणता आवाज आणि विणकरांनी बनवलेली हिमरू शाल बघायला मिळते. इथला राजाबाजार, नवाबपपुरा, दिल्ली गेट आणि जाफर गेट या शहराच्या महत्वाच्या आणि पुरातन भागात आपल्याला सातशे वर्षांचा देदिप्यमानइतिहास असलेले आणि अस्सल ठेवणीचे हातमागावर तयार झालेले हिमरू वस्त्र पाहायला मिळते. हे वस्त्र पाहूनआपल्याला या निर्मितीमागच्या हातांचे आणि यांची मूळ निर्मिती करणाऱ्या पूर्वजांबद्दल अभिमान वाटायलालागतो.
हिमरूचा इतिहास
हे वस्त्र मिळते. हिमरू म्हणजे हम-रूह. मुळात इराणमधील किनखाबीया पार्शियन विणकाम कलेतून निर्माण झालेला शब्द होय. तिकडे किनखाबी हे वस्र सोने-चांदीपासून बनवले जातअसे. सोने, चांदी आणि जरीपासून बनवलेले कपडे राजे महाराजे घालत असत. चौदाव्या शतकात मुहम्मदतुघलकाने दिल्लीहून दौलताबादला स्थलांतर केले. त्यांच्यासोबत वस्रकला अवगत असणारे इराणी विणकरहीआले. मुहमंद तुघलक १३२७ ते १३३४ अशी आठ वर्षे औरंगाबाद नजीकच्या दौलताबाद किल्ल्यात वास्तव्यासहोता. त्या काळात खडकी परिसरातील म्हणजे सध्याच्या औरंगाबाद आणि जालना अशा वेगवेगळ्या ठिकाणी हेविणकर हाताने किनखाबी वस्र विणण्याची कामे करू लागली. आपल्याकडे त्या वस्रांना किनखापाचे वस्रे म्हणत. मात्र, इथे सोने चांदीऐवजी रेशमी आणि कापूस धागे वापरून हिमरू कपडा विणला जात असे. कापडावरीलनक्षीकाम हे मूळ किनखाबी नक्षीशी मिळतेजुळते (हम-रूह) असल्याने त्यास हिमरू म्हटले जाऊ लागले. ज्याकापडात जास्त गुंतागुंतीची नक्षी असेल, त्यास ‘मशरू ‘ हे नाव दिले गेले. पुढे सुलतान मुहमंद तुघलक हा १३३४ साली दिल्लीला परत गेला. तुघलकाबरोबर आलेले विणकर मात्र परत न जाता इथेच राहिले आणि त्यांनीऔरंगाबादेत हिमरू-मशरू वस्रांचे उत्पादन सुरूच ठेवले. ऐतिहासिक शहर असलेल्या औरंगाबाद शहराच्या ख्यातीतहिमरू आणि पैठणीमुळे भर पडली.
ऐतिहासिक वारसा:
अदिलशहाचा हुशार वजीर मलिक अंबर याने हे विणकाम करणाऱ्या हिमरू विणकरांना खूप प्रोत्साहन दिले होते. त्याकाळी हे संपूर्ण विणकाम केवळ हातांनी केले जार्इ. परंतु विसाव्या शतकाच्या प्रारंभी या व्यवसायातहातमागाचा वापर सुरू झाला. १९२५ साली यंत्रमाग असणारी औरंगाबाद सिल्क मिल स्थापन झाली. या मिलमध्येयंत्राद्वारे उत्पादन सुरू झाले. म्हणजे सातशे वर्षापूर्वी हे वस्र हातावर विणले जात होते. पुढे पायडल लूम म्हणजेहॅन्डलूम झाले आणि आता यंत्रमाग असा या हिमरू वस्राचा प्रवास सुरू झाला आहे. मुघल-ए-आझम या चित्रपटातदिलीपकुमार यांनी परिधान केलेली शेरवानी ही हिमरूचीच होती आणि विशेष म्हणजे त्याची निर्मिती औरंगाबादेतचझाली होती.
सुंदर डिझाइन:
हिमरू-मशरू या नावाने शालीचे विविध प्रकार, नक्षीदार साड्या, शेरवानी असे कपडे असतात. औरंगाबादेतहिमरूची कला पुनरूज्जीवित करण्याचे श्रेय कुरेशी कुटुंबाला जाते. हिमरू वस्त्राच्या या व्यवसायामुळे आजमहिला आणि पुरूष विणकरांच्या घरात अनेक हातमाग स्थापित झाले आहेत. यामुळे या विणकरांना चांगलारोजगार मिळत आहे. फॅब्रिक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या डिझाइन्स अजिंठा आणि एलोरा कॅव्हिंगच्यापेटिंगपासून प्रेरित आहेत. मुळचा मुघलकालीन फुलांचा आकृतीबंध आजही तसाच वापरला जातो. पाचपिढ्यांपासून हा वसा चालवत असलेले व्यक्ती म्हणजे अहमद कुरेशी. अहमद कुरेशी यांना आजवर अनेकपुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गेल्या 50 वर्षांत या व्यवसायात असल्याने त्यांनी या वस्रांचा पोत-रंग, नक्षीकाम या गोष्टीबाबत अभिनव विचार करून काही बदलही केले आहेत. अहमद कुरेशी आज ७९ वर्षाचे आहेत. त्यांचे चिरंजीव इमरान कुरेशी यांनी हा व्यवसाय टिकवून तर ठेवलाच परंतु अजिंठा, वेरूळ येथील गुफाचित्रांमधील कमळाची डिझाइन विकसित केली. निरनिराळ्या हिमरू-मशरू वस्रांवरील डिझाइनही त्यांनी निर्मितीप्रक्रियेत समाविष्ट करून घेतल्या. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना ते अत्यंत वेगळ्या धाटणीची आणि अस्सलहिमरू शाल मिळू शकते. अहमद कुरेशी यांच्या हिमरू फॅक्टरीला आम्ही भेट दिली. फॅक्टरीमध्ये सध्या तीन लूमलागले आहेत. इमरान कुरेशी यांनी आम्हाला हातमाग कसा चालवला जातो तसेच दोन विणकर यावर एकाचवेळीकसे काम करू शकतात, याचे प्रात्यक्षिक दाखवले. अतिशय सुंदर बुट्टी आणि वेलीच्या डिझाइन असलेली शालविणकरांनी विणली होती. अर्थात हे वस्त्र एका दिवसात विणले जात नाही. दहा दिवसानंतर तयार झालेली तीसुंदर शाल हलकेच अंगावर टाकून आम्ही इमरानचा फोटो काढला. इमरान सांगत होते की, या लूमवरअडकलेल्या दोऱ्यांचा गुंता म्हणजे डिझाइन आहेत. या डिझाइन पारंपरिक आहेत. एका पोत्यातून त्यांनी दोऱ्यांचीगुंडाळून ठेवलेल्या अनेक डिझाइन बाहेर काढल्या. ती गुंतागुंत सामान्य माणसांना समजणे कठिणच. त्यांची ठेवणकेवळ आणि केवळ विणकरच समजू शकतो. हिमरूचे दोन प्रसिद्ध प्रकार म्हणजे गुलबदन व शहामहंमद. यादोन्ही ताजा नक्षीकाम राखून विशिष्ट पद्धतीने रंगविलेल्या असतात. पूर्वी वनस्पतीजन्य रंग वापरले जायचे. केशरी, हिरवा, किरमीजी जांभळा हे रंग विशेष वापरले जातात.
अस्सल हिमरू कशी ओळखावी
आजकाल प्राचीन गोष्टींच्या नावाखाली बनावट वस्तू देण्याचे प्रमाण खूप आहे. अस्सल हिमरू कशी ओळखावी, हाही याच पठडीतला प्रश्न. औरंगाबामध्ये आज अनेक ठिकाणी तुम्हाला हिमरू शाल पॉवरलूमवर तयार झालेलीदिसते. याबाबत इमरान कुरेशी खेद व्यक्त करतात. ते म्हणतात, ३०० ते ४०० रूपयांना मिळणारी हिमरू शाल हीअस्सल नाही. ती पॉवरलूमवर बनवलेली असते. अस्सल हिमरूची वीण ही आडवी असते आणि त्याची रचनाचौखड्यासारखी दिसते. शिवाय, अस्सल हिमरूची पोत आपल्या चटकन लक्षातही येऊ शकते. हिमरूची अस्सलशाल बनवण्यासाठी किमान दहा दिवस लागतात. इमरान यांच्या मते, हिमरूची साडी कधीच बनत नाही. हिमरूचीशेरवानी, जॅकेट, टॉय, शाल अशीच वस्त्रे बनतात.
डेक्कनचे उत्कृष्ट फॅब्रिक :
संशोधक मार्को पोलोने म्हणतात, हिमरू हे डेक्कनचे उत्कृष्ट फॅब्रिक आहे. मध्ययुगीन काळात राजे आणि राणीयांच्याजवळ हिमरूचा प्रचंड संग्रह असायचा. मार्को यांना डेक्कन परदेशात हिमरू शाल भेट देण्यात आली होती. मार्को लिहितात की, हे कोळ्याच्या जाळीसारखे वस्र आहे. हिमरूचे वस्त्र परिधान करणाऱ्या राजा किंवा राणीलात्याचा वेगळाच अभिमान असायचा. बदलत्या फॅशन दुनियेत औरंगाबादच्या हिमरू शालीने अस्तित्व अबाधितचठेवले आहे. केवळ थंडीपासून बचाव करण्यासाठीच नाही तर फॅशन शो आणि पार्टींमध्येही हिमरू शालचा वावरदिसून येतो. फॅशनचा नवा ट्रेंड म्हणूनही हिमरूचे लौकिक आहे. राजेशाही थाटाचा एक अनुभव म्हणून अनेकजन याशाली खरेदी करताना दिसतात. ऐतिहासिक वारसा असलेली हिमरू कालौघात टिकून असली तरी तिच्याअस्तित्वाबाबत बरेच प्रश्नचिन्ह आहेत. कारण, हिमरूचा वारसा जपणारे आणि त्याच्या निर्मितीमागच्या हातांनाहीमदतीची अपेक्षा आहे.
प्राचार्य डॉ.रेखा शेळके
.jpeg)
Comments
Post a Comment